आज महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री व इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते शिवाजी लाळगे लिखित आठवणींच्या हिंदोळ्यावर या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.शिवाजी लाळगे हे इंदापूर तालुक्यातील बोरी गावचे असून सध्या ते काझड प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.आज दुपारी 12.05 मिनिटांनी कर्मयोगी शंकरराव पाटील सांस्कृतिक भवन शिक्षक सोसायटी इंदापूर या ठिकाणी या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.शिवाजी लाळगे यांनी लिहीलेले आठवणींच्या हिंदोळ्यावर हे पुस्तक जुन्या काळातील प्रसंगावर आधारीत पुस्तक आहे.जुन्या काळातील पडद्यावरील पिक्चर,लग्न सोहळा,जागरण,शाळा अशा विविध विषयांवर लेखन या पुस्तकात केले आहे.पुस्तक वाचताना प्रत्येक व्यक्तीचे बालपण डोळ्यासमोर आल्याशिवाय रहाणार नाही असे मत लेखक शिवाजी लाळगे यांनी व्यक्त केले.अनेक शब्द,वस्तू खेड्यात राहणाऱ्या आजच्या पिढीच्या अनुभवविश्वात सामावलेल्या नसल्याने त्यांनाही त्या विशेष वाटतील.तर नव्या शहरी पिढीला अनेक गोष्टी नवलपूर्ण वाटतील.लेखकाने स्वतः गरीबीशी संघर्ष करुन अत्यंत कष्टातून शिक्षण घेऊन प्रगती केलेली आहे.सध्याच्या पिढीला प्रेरणादायी काही प्रसंग या पुस्तकात लिहिलेले आहेत.म्हणून हे पुस्तक सर्वांना वाचनीय आहे.या पुस्तकाची मूळ किंमत 150 रुपये असून सवलतीच्या दरामध्ये फक्त 100 रुपयाला हे पुस्तक उपलब्ध होणार आहे. तरी या सोहळ्यास उपस्थित राहून हे पुस्तक खरेदी करावे अशी विनंती लेखक शिवाजी लाळगे यांनी केली.
Home Uncategorized इंदापूर तालुक्यातील बोरी गावचे शिवाजी लाळगे लिखित “आठवणींच्या हिंदोळ्यावर” या पुस्तकाचे आ.दत्तामामा...