इंदापूर तालुक्यातील नामांकित सुवर्णयुग सहकारी पतसंस्थेची निवडणूक जाहीर

इंदापूर तालुक्यातील अनेक सहकारी सोसायट्या तसेच पतसस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून तालुक्यातील नामांकित असणाऱ्या सुवर्णयुग सहकारी पतसंस्थाची निवडणूक प्रक्रिया ही जाहीर झाली आहे. इंदापूर तालुक्यातील ही नावाजलेली पतसंस्था आहे तितकीच वादग्रस्त असून कामगारांनी केलेले गैरव्यवहार तसेच ऑफिस भाडे या न त्या अनेक कारणाने ही पतसंस्था वादग्रस्त झाली होती. या निवडणुकीत आजी-माजी चेअरमन संचालक यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे .दोन्ही पॅनल प्रमुखांचे उमेदवार अजूनही गुलदस्त्यातच आहेत. इंदापूर तालुक्यातील सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे ही निवडणूक प्रक्रिया पुढील प्रमाणे२०/०५/२०२२ ते २६ / ०५/२०२२ फॉर्म भरणे,२७/०५२०२२ फॉर्म छाननी प्रक्रिया,१३/०६/२०२२ फॉर्म माघारी घेणे,२६/०६/२०२२ मतदान व निकाल
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here