बारामती: शब्दधन सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून ९ क्षेत्रातील ९ महिलांचा नवदुर्गा अवार्ड्स सन्मान करण्यात आला.. इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेडणी या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या प्राथमिक शिक्षिका श्रीमती सुप्रिया गेनबा आगवणे यांना प्राथमिक शिक्षण क्षेत्रात विशेष आणि प्रेरणादायी कार्य करण्यासाठी नवदुर्गा अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. श्रीमती सुप्रिया गेनबा आगवणे या गेली दहा वर्ष प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत त्याच बरोबर सामाजिक क्षेत्रातही त्यांचे कार्य चालू आहे.. यांनी राबवलेले उपक्रम जिल्हा आणि राज्य पातळीवर गौरविण्यात आलेले आहेत.. राज्य स्तरावरील विविध शैक्षणिक उपक्रमात त्यांचा सहभाग आहे. मुलाखतीच्या माध्यमातून प्राध्यापक वाबळे सरांनी नवरात्र उत्सवा मध्ये जागर स्त्रीशक्तीचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रीमती सुप्रिया गेनबा आगवणे यांच्या प्रेरणादायी कार्याचा आढावा घेतला होता. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा प्रेरणादायी प्रवास युट्युब लाईव्ह मुलाखतीच्या माध्यमातून दाखवण्यात आला होता. याच महिलांचा सन्मान आज दिनांक 17 ऑक्टोबर 2019 रोजी बारामती या ठिकाणी करण्यात आला. हा सन्मान डॉक्टर नीरज शहा( आत्मीय एज्युकेशन पुणे)यांच्या हस्ते श्रीमती सुप्रिया गेनबा आगवणे यांना प्रदान करण्यात आला. बँकिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला त्याचबरोबर व्यवसाय ब्युटीशियन नोकरी या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व इतर महिलांना प्रेरणा मिळेल असे कार्य करणाऱ्या या महिलांचा सन्मान शब्दधन सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने करण्यात आला.नवदुर्गा अवॉर्डने सन्मानित झालेल्या व प्रेरणादायी असे कार्य करणाऱ्या या सर्व महिलांनी आजच्या कार्यक्रमांमध्ये आपले मनोगत व्यक्त केले.आजच्या कार्यक्रमांमध्ये मनोगत व्यक्त करत असताना श्रीमती सुप्रिया आगवणे यांनी इंदापूर तालुक्यातील सर्व अधिकारी वर्गाचे व शब्दधन सोशल फाउंडेशन चे आभार व्यक्त केले.