इंदापूर: स्व आर आर आबा पाटील सुंदर गाव पुरस्कारात सन- 2021-22 इंदापूर तालुक्यातील चाकाटी गावांनी प्रथम क्रमांक पटकाविला. यानिमित्ताने जिल्हास्तरीय समितीने आज दि. 2 जून 2022 रोजी गावाला भेट दिली. व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रथम गावांची जिल्हा स्तरावरील समिती ने पाहणी केली. या पार्श्वभूमीवर अधिकारी यांनी आज चाकाटी गावाला भेट दिली.
इंदापूर तालुक्यातील नदीकाठी वसलेले चाकाटी गावाला स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक मिळताच गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शाळा, अंगणवाडी, बायोगॅस गावातील रोजगार हमी योजना या सर्व कामाचे पाहणी पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभागाचे कमलाकर रणदिवे व इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी गावात पाहणी केली.चाकाटी चे सरपंच संजय बबन रुपनवर यांनी जनता एक्सप्रेस शी बोलताना सांगितले.
चाकाटी गावचे सरपंच बोलताना म्हणाले की स्वर्गवासी आर आर आबा ग्रामस्वच्छता अभियानात गावाचा प्रथम क्रमांक मिळण्यात गावातील ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व गावातील व ग्रामस्थांचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांमुळे या चाकाटी या गावाचा इंदापूर तालुक्यात स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक पटकावला बरोबर जिल्ह्यात या गावाची ओळख निर्माण होईल व गावाचा कायापालट होईल व गावात महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावातील जनतेला होईल. या सर्व कामांसाठी लागणारा विकास निधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार खासदार सुप्रियाताई सुळे इंदापूर तालुक्याचे आमदार दत्ता मामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली व इंदापूर चे राष्ट्रवादी चे उपाध्यक्ष नवनाथ आबा रुपनवर सर्वांच्या सहकार्यामुळे कामे पूर्ण केली. गावात आज आनंदी वातावरण निर्माण झाले आहे व गावातील लोकांनी एकमेकांची साथ देत आपले गाव सर्व पुरस्कारात कसे समाविष्ट होईल यासाठी सर्व गावकरी यांनी प्रयत्न करावे. असे यावेळी सकाळी चे सरपंच संजय रुपनवर यांनी उद्गार काढले.
यावेळी गावातील ज्येष्ठ नेते केशव मारकड, सोसायटी चे चेअरमन रामचंद्र मारकड, ग्राम पंचायत सदस्य आबासाहेब मारकड,समाधान घोडके पोलीस पाटील भालचंद्र मारकड व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.