इंदापूर तालुक्यातील चर्चेतील ग्रामपंचायत असलेल्या लाखेवाडीवर शेवटी राष्ट्रवादीचाच झेंडा. सरपंच आणि उपसरपंच दोन्हीही राष्ट्रवादीचेच.

लाखेवाडी:गेल्याच काही दिवसापूर्वी इंदापूर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला होता. त्यामधील अतिशय हाय व्होल्टेज समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायती पैकी सर्वात चर्चेत असलेली ग्रामपंचायत म्हणजे लाखेवाडीची. आणि या ग्रामपंचायतीतील निकालही अतिशय हाय व्होल्टेज प्रमाणेच लागला होता.बावडा जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद उमेदवार म्हणून श्रीमंत ढोले यांच्याकडे पाहिले जाते आणि त्यांच्याच गावातील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणे हे ढोले सरांसाठी खूप प्रतिष्ठेचे होते. शेवटी भाजपाचे सात आणि राष्ट्रवादीचे सात असे सदस्य निवडून आले आणि दोन्ही बाजूने उपसरपंच आमचाच असा दावा होऊ लागला.लाखेवाडी ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच पदी सौ.चित्रलेखा श्रीमंत ढोले या निवडून आल्यानंतर प्रशासनाकडून उपसरपंच पदा करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. आज उपसरपंच निवडूणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व मा.जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले सर यांच्या मार्गदर्शनाने श्री राजेंद्र जगन्नाथ भोसले यांनी उपसरपंच पदाची निवडणूक जिकूंन ग्रामपंचायत लाखेवाडीवर सरपंच व उपसरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व सिद्ध झाले.भाजपा आणि राष्ट्रवादीचे सात-सात सदस्य निवडून आल्यानंतर जनतेतून निवडून आलेल्या सरपंच उमेदवारास दोन मते देण्याचा अधिकार प्राप्त झाल्याने सात भाजपाचे आणि आठ राष्ट्रवादी काँग्रेसला मत मिळाली आणि राष्ट्रवादीचे उपसरपंच पद फिक्स झाले.उपसरपंच निवडणूक प्रक्रिया लाखेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. चित्रलेखा श्रीमंत ढोले यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक निरीक्षक म्हणून सहा. गट विकास अधिकारी डॉ राम शिंदे, ग्रामसेवक गणेश खरमाटे यांनी पार पडली.एकंदरीतच अतिशय चर्चेत असलेल्या या ग्रामपंचायतीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचेच निर्विवाद वर्चस्व असे म्हणता येईल.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here