इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्थेच्या निवडणूकमध्ये आजी/माजी चेअरमन यांचा अर्ज दाखल.

इंदापूर: सन 1925 मध्ये स्थापन झालेल्या आणि इंदापूर तालुक्यातील शिक्षकांची आर्थिक नाडी बनलेल्या इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांची पतसंस्थेचे निवडणुकीचे बिगुल आता वाजू लागले आहे. या संस्थेची सण 21/22 ते 25/26 या कालावधीकरिता पंचवार्षिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत.
आणि यामुळेच काल सोमवारी प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.आज पहिल्याच दिवशी भिगवण लोणी देवकर आणि इतर मागास प्रवर्ग यातून संस्थेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक सुनील वाघ आणि माजी चेअरमन सुनील शिंदे यांनी देखील आपला अर्ज दाखल केला असल्याने सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.त्याचप्रमाणे इंदापूर मतदार संघातून इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थाचे कार्यक्षम चेअरमन वसंत फलफले यांनीही आपला नामनिर्देश अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जिजाबा गावडे यांच्याकडे दाखल केला. सोमवारी पहिल्याच दिवशी दुपारपर्यंत एकूण सहा अर्ज दाखल झाले होते.अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक मानली जाणाऱ्या या पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये 951 सभासद असून या पतसंस्थे मार्फत सभासदांना वेगवेगळ्या गरजांसाठी कर्ज देऊन त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे काम या संस्थेने केले आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने ही संस्था सभासदांसाठी आर्थिक कणा मानली जाते म्हणून या निवडणुकीस महत्त्व प्राप्त झालेले आहे.
यावेळी दीपक वाघ सचिन वेदपाठक संजय लोहार हरीश काळे अमोल बोराटे इत्यादी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here