बेलवाडी येथे पार पडलेल्या इंदापूर तालुकास्तरीय 14 वर्षे वयोगट कबड्डी स्पर्धेमध्ये एल.जी.बनसुडे मराठी मेडीयम स्कुल पळसदेव घवघवीत यश.
पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय व युवक सेवा संचालय व क्रीडा अधिकारी व क्रीडा शिक्षक संघटना इंदापूर यांच्या अंतर्गत तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये एल जी बनसुडे मराठी मीडियम स्कूल विरुद्ध श्री नारायणदास रामदास इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर यांच्या मध्ये फायनल चा सामना झाला.या सामन्यांमध्ये एल जी बनसुडे मराठी मीडियम स्कूल संघाची कर्णधार सिद्धी कन्हेरकर हिच्या कर्णधारपदाखाली या संघाने श्री नारायणदास इंदापूर या संघाला 9 गुणांनी पराभूत करत प्रथम क्रमांक मिळवला सर्व खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली सहभागी खेळाडू सिध्दी कन्हेरकर ,संस्कृती जगताप ,सृष्टी बनसुडे ,अनुष्का बनसुडे ,मधुरा बनसुडे, साक्षी मोटे ,तनिष्का कन्हेरकर ,आरोही शिंदे ,कादंबरी विपट ,सिद्धी शिंदे ,स्वरांजली शिंदे ,पूजा बनसुडे या सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षक सागर बनसुडे सर व रुपेश भालेराव सर यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आ. हनुमंत नाना बनसुडे , कार्याध्यक्षा सौ. नंदाताई बनसुडे, सचिव नितीन बनसुडे , प्राचार्या वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहूल वायसे आदींनी अभिनंदन केले
Home Uncategorized इंदापूर तालुकास्तरीय 14 वर्षे वयोगट कबड्डी स्पर्धेमध्ये एल.जी.बनसुडे मराठी मेडीयम स्कुल पळसदेव...