इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या निष्काळजीपणामुळे आरोग्य शिबिराचा लाभ घेता आला नाही.

👉 राष्ट्र सेवा दलाचे राज्य संघटक गफूरभाई सय्यद आरोप..
-👉 प्रशासनाचा केला निषेध..
इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबीरात रुग्णालयाच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक गोरगरीब गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवेपासून वंचित रहावे लागले आहे,असा घणाघाती आरोप करुन वैद्यकीय अधीक्षक यांच्या निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे सांगत अनेकांना वैद्यकीय सेवेचा लाभ खूप लोकांना घेता आला नाही, या बाबीचा राष्ट्र सेवा दलाचे राज्य संघटक गफूरभाई सय्यद यांनी निषेध केला आहे.या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर सय्यद यांनी शंका व्यक्त केली असून वैद्यकीय अधीक्षक यांना जबाबदार ठरवून त्यांच्यावर कार्यवाही व्हावी,अशी मागणीही सय्यद यांनी केली.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी झालेल्या महाआरोग्य मेळाव्यास अल्प प्रतिसाद दिसून आला होता.यामुळे प्रसिध्दीमाध्यमातून यावर वास्तव बातम्या आल्यावर रुग्णालयाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला.यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित केल्याची चर्चाही झाली.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले होते.
कोविडच्या महाभयंकर संकटावेळी गफूरभाई सय्यद यांनी वैद्यकीय अधिकारी, तहसील प्रशासन व पंचायत समितीच्या प्रशासनाला सहकार्य केले होते.कोविड काळात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा पुढाकार घेऊन अंत्यविधी करण्यासाठी महत्त्वपुर्ण योगदान दिले आहे.या कार्याचा गौरव ही करण्यात आला होता.आता सय्यद यांनी केलेल्या आरोपांमुळे उपजिल्हा रुग्णालयातील कारभाराच्या प्रश्नावर वातावरण ढवळणार असल्याचे दिसते.
सरकारी अनुदानाचा गैरवापर करण्याच्या उद्देशाने रुग्ण कमी कमी यावेत यासाठीचा तर हा प्रयत्न असावा अशी शंका सय्यद यांनी व्यक्त केली आहे. मुळात हे आरोग्य शिबिर इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तींसाठी खूप महत्त्वाचे होते.कोविड नंतर बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्याबाबत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामध्ये जर सर्वांपर्यंत हा निरोप पोहोचला असता अथवा कार्यक्रमाच्या आयोजनात संदर्भात बातमी अथवा जाहिरात झाली असती तर निश्चितच खूप लोकांना याचा लाभ घेता आला असता, परंतू वैद्यकीय अधीक्षकांच्या निष्काळजीपणामुळे आरोग्य शिबिराचा लाभ खूप लोकांना घेता आला नाही असा आरोपही सय्यद यांचा आहे. तसेच सर्वसामान्य रुग्णांची केलेली फसवणूक ही अक्ष्यम्य असल्याचेही सय्यद यांनी म्हटले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here