इंदापूर: शिवसेनेच्या माध्यमातून सध्या वेगवेगळे उपक्रम राबवली जात आहेत त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे शिवसेना नेहमीच चर्चेत राहिली आहे.काल मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख अधिकारी मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त विजय बापू शिवतारे उपनेते शिवसेना यांच्या सूचनेनुसार व भूषण दादा सुर्वे सोशल मीडिया प्रमुख व अँड गितांजली ताई ढोणे शिवसेना बारामती लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज इंदापूर येथे इंदापूर क्रिटीकेअर हाॅस्पिटल मध्ये आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.यावेळी डॉ मिलिंद खाडे यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन व रुग्ण तपासणी करण्यात आल्या.इंदापूर तालुकयातील रूग्ण यांना डायलेसीस साठी मोफत सुविधा उपलब्ध करून दिली त्याबद्दल क्रिटीकेअर सेंटर चे आभार मानण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील शहराध्यक्ष अशोक देवकर दुर्वा शेवाळे, सागर आवटे अँड आनंद केकाण सोमनाथ लांडगे, शिवसेना महिला आघाडीच्या रूपाली रासकर,निर्मला जाधव, ज्योती शिंदे ,सोनम खरात या उपस्थित होत्या.
Home Uncategorized इंदापूरात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या वाढदिसानिमित्त आरोग्य शिबीर...