इंदापूर : पाचोरा (जि.जळगाव) येथील पत्रकार संदिप महाजन हे रेल्वे आंदोलणाच्या बातमीचा इतिवृतांत घेवुन त्यांच्या घरी परतत असताना पाचोरा गावातील मुख्य चौकात गावगुंडाकडून संदिप महाजन यांचेवर भ्याड हल्ला झाला.सदरची घटना ही गंभीर स्वरूपाची असुन देखील तेथील स्थानिक पोलीसांनी आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला नाही.सदर घटनेचे पडसाद संपुर्ण महाराष्ट्रभर उमटले.सदर घटनेचा निषेध करण्यासाठी इंदापूर तालुक्यातील पत्रकारांनी काळ्या फीती लावुन मोर्चाद्वारे जाहिर निषेध नोंदविला.व संबधीत आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून पत्रकार संदिप महाजन व त्याचे कुटुंबीय यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.सोमवार दि.१४ आॅगष्ट २०२३ रोजी तालुक्यातील पत्रकार हे इंदापूर नगरपरिषद मैदान येथे सकाळी ठीक ११ वाजता जमा झाले.तेथुन काळ्या फीती लावुन मोर्चा काढण्यात आला.सर्वप्रथम इदापूर पोलीस निरिक्षक दिलीप पवार यांना निवेदन देण्यात आले.त्यानंतर मोर्चा तहसिल कार्यालय या ठिकाणी नेण्यात आला.या ठिकाणी निवासी नायब तहसिलदार आणिल ठोंबरे यांना पत्रकारांच्या वतीने निवेदन देण्यात आले.व पाचोरा येथे पत्रकारास झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदविण्यात आला.तसेच पत्रकार संदिप महाजन यांचेवर झालेल्या हल्यातील आरोपीवर कायदेशिर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी सुवर्णयुग पतसंस्थेचे माजी व्हा.चेअरमन पोपट पवार, सामाजिक कार्यकर्ते सिताराम काटे, लहुजी शक्ती सेना पुणे जिल्हाध्यक्ष दत्ता जगताप,शिवशाही शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष नितिन आरडे, मोहन देवकर, शिवसेना (शिंदे गट) इंदापूर शहरध्यक्ष आशोक देवकर,सोनु ढावरे यांनी पत्रकार निषेध मोर्चाला पाठींबा दिला.स्थानिक आमदार यांचे सहकारी गावगुंड यांनी पत्रकार संदिप महाजन यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असुन.सदरची घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी व लोकशाहीचे धिंडवडे उडवणारी आहे.स्थानिक आमदार यांनी घटनेच्या आदल्या दिवशी पत्रकार संदिप महाजन यांना अर्वाच्च शिविगीळ केली होती.आणि त्याच्या दुसर्या दिवशी संदिप महाजन यांचेवर गावगुंडाकडुन भ्याड हल्ला घडवुन आणण्यात आला.सदर प्रकरणातील हल्याचे मुख्य सुत्रधार हे स्थानिक आमदार हेच असुन आमदारासह सर्व आरोपींचा व घटनेचा तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने निषेध करण्यात आला.या प्रसंगी इंदापूर तालुक्यातील पत्रकार मोठ्या संखेने उपस्थित होते.सुधाकर बोराटे,प्रकाश आरडे,काकासाहेब मांढरे,कैलास पवार, धनंजय कळमकर, सचिन खुरंगे,शिवाजी पवार, प्रदिप तरंगे, आबासाहेब उगलमोगले,पल्लवी चांदगुडे, तुकाराम पवार, संतोष जामदार, मुक्तार काजी, श्रेयश नलवडे, प्रदिप पवार, जितेंद्र जाधव, विजय शिंदे, सिद्धार्थ मखरे, बापू बोराटे, निलकंठ भोंग, निलेश गायकवाड, संजय शिंदे, शिवकुमार गुणवरे, तात्याराम पवार, आण्णा गायकवाड, शंकर बोडके, नानासाहेब लोंढे, इम्तियाज मुलाणी, गणेश कांबळे, राकेश कांबळे, आदित्य बोराटे, तेजस्वी काळे, सतिश जगताप, आशोक घोडके, धनाजी शेंडगे, विजय भगवान शिंदे, सलीम शेख, प्रदिप पवार इत्यादी पत्रकार उपस्थित होते.