इंदापूर: नुकतीच मनोज जरांगे पाटील यांची तुफानी सभा इंदापूरात झाली.या सभेसाठी तालुक्यातील हजारो मराठा समाजातील बांधव उपस्थित होते.रखरखत्या उन्हात तालुक्यातील कानाकोपऱ्यातून मराठा समाजाने यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला दिसून आला. अनेक समाज बांधवांनी आपापल्या सोयीनुसार सभेसाठी उपस्थित लोकांसाठी नाष्ट्या,पाणी,दूध बिस्किट,लेमन,गोळ्या उन्हापासून संरक्षणासाठी टोप्या इत्यादीचे नियोजन केले होते. या विराट सभेमध्ये एक सामाजिक बांधिलकी व सलोख्याचे दर्शनही दिसून आले.इंदापूर शहरातील लोकप्रिय युवा नेतृत्व तथा आमचे मेंबर ग्रुपचे अध्यक्ष अनिल अण्णा पवार यांनी मराठी समाज बांधवांसाठी थंडगार पाण्याचे जारची सोय केली होती व ते स्वतः लोकांना पाणी देण्याचे काम करत होते.अनिल अण्णा पवार हे वडार समाजाचे नेते आहेत व त्यांचे महाराष्ट्र स्तरावर वडार समाजाच्या न्याय हक्कासाठी गेल्या अनेक वर्ष काम करत आहेत. जरी ते वडार समाजाचे काम करत असले तरी मराठा समाजाप्रती असणाऱ्या प्रेमापोटी व मराठा बांधव हे भर उन्हात जरांगे पाटील यांची सभा ऐकण्यासाठी बसणार आहेत म्हणून त्यांना पिण्याचे पाणी कमी पडू नये या भूमिकेतून त्यांनी पिण्याचे 300 जार थंडगार पाणी देण्याचे काम केले.याबद्दल अनिल अण्णा पवार यांच्याशी जनता एक्सप्रेसच्या माध्यमातून बातचीत केली असता ते म्हणाले की,”रोजच्या सामाजिक जीवनात काम करत असताना तालुक्यातील अनेक मराठी बांधवांशी माझा संबंध येतो व तो संबंध अत्यंत जिव्हाळ्याचा आहे अशी जिव्हाळ्याची मित्र उन्हात बसल्यानंतर त्यांना त्रास होऊ नये व किमान फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांना माझा हातभार लागावा म्हणून मी हे काम केले आहे”असे अनिल अण्णा पवार यावेळी म्हणाले.त्यांना या कामात पिंटू घोडके,अनिल चौगुले,बाबा चौगुले,किसन चौगुले भैया पवार इत्यादींनीही सहकार्य केले. एकंदरीतच परवा झालेल्या विराट सभेमध्ये अनिल अण्णा पवार यांनी केलेल्या पाण्याच्या सोयीमुळे मराठा समाजाप्रती असणारे त्यांचे प्रेम यातून दिसून दिसून येत होते व सामाजिक सलोख्याचेही दर्शन घडत होते.
Home Uncategorized इंदापूरात झालेल्या मनोज जरांगे यांच्या सभेसाठी अनिल अण्णा पवार यांच्याकडून ३०० जार...