इंदापूरमध्ये दूधगंगा संघात आज हर्षवर्धन पाटील साधणार कार्यकर्त्यांशी संवाद. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण.

इंदापूर:आज रविवार दुपारी 2 ते 4 दरम्यान इंदापुरातील दूधगंगा संघात भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती तथा इंदापूर नगरपालिकेच्या दृष्टीने रणनीती ठरवण्यासाठी हा संवाद असू शकतो. नुकतेच भारतीय जनता पार्टी व शिंदे गट शिवसेना यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झालेला असून येणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे निर्वाह निर्विवाद वर्चस्व राखण्यासाठी भाजपा कार्यकर्ते तयारीत आहेत आणि त्याच अनुषंगाने आजची बैठक असू शकते.त्याचप्रमाणे नुकतेच ओबीसी आरक्षणाचा विषय निकाली निघाल्यानंतर ओबीसी समाज देखील समाधानी असून   इंदापूर तालुक्यात भाजपा युवा कार्यकारणीचे कमिटी प्रमुख राजवर्धन पाटील, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील युवकांशी संपर्क साधून सक्षम युवकांची बांधणी करून भाजपा पक्ष वाढवण्यास हातभार लावत आहेत.त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षापासून युवानेते राजवर्धन पाटील व अंकिता पाटील-ठाकरे ह्या तालुकाभर लोकांच्या सुखदुःखात सहभागी झाल्याने जनतेचा विश्वास निर्माण करण्यास ते यशस्वी झाल्याचे दिसून येतेे. या सर्व गोष्टींमुळे सद्यस्थितीत भारतीय जनता पार्टी  पक्ष मजबूत स्थितीत असल्याचे दिसून येतो.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here