इंदापूर: गेल्या काही दिवसापासून इंदापूर पोलीस खाते हे वेगवेगळ्या गुन्ह्यातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी झालेले असतानाच नुकतेच देशी विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या कारवर कारवाई करत कारमधील दारूच्या पस्तीस बॉक्स सह एकूण 3 लाख 80 हजाराचा मुद्देमाल इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ही कारवाई सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास काटी-रेडा रस्त्यावर करण्यात आली. याबाबत इंदापूर च्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीस नाईक मनोज गायकवाड यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
इंदापूर पोलिसांनी तेजस सुरेश खिल्लारे व आसिफ रमजान तांबोळी (रा.जावईवाडी, अकलूज नाका, इंदापूर) यांच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,काल सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुकयातील काटी रेडा या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या सिल्व्हर रंगाच्या मारुती कारमधून दारूची वाहतूक होत असल्याचे समजल्यावरून पोलिसांनी रस्त्यावरील पाटील डेअरी समोर ही कार ताब्यात घेताच या मध्ये दारूचे पस्तीस बॉक्स आढळून आले.
इंदापूर पोलिसांनी देशी विदेशी दारूच्या बॉक्स मधील 80 हजार रुपये किमतीची दारू व तीन लाख रुपये किंमतीची मारुती कार असा एकूण तीन लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.पुढील तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पाटील पुढील तपास करत आहेत.
इंदापूर पोलीस स्टेशन च्या कामगिरीवर इंदापूरकर समाधानी : गेल्या काही दिवसापासून इंदापूर पोलिस स्टेशन हे पेट्रोलिंग च्या कामगिरीतून इंदापूरकरांचे मन जिंकण्यात यशस्वी झालेले असून प्रत्येक गल्लोगल्ली व सर्व अंतर्गत नागरिक वस्ती तसेच दिवाळीच्या सीझनमध्ये सर्व व्यापारी वर्गांच्या दारोदारी चालत जाऊन इंदापूर पोलिसांनी पेट्रोलिंग ची जबाबदारी पार पाडली होती त्यामुळे इंदापूर मधील सर्वसामान्य जनता इंदापूर पोलिस स्टेशनच्या कामावर समाधानी असल्याचे चित्र दिसून येत आहे.. त्याचबरोबर इंदापूर पोलिस स्टेशन च्या ऑफिस परिसरातील साफसफाई , स्वच्छता व रंगरंगोटी चांगल्या पद्धतीने झाली असल्याने इंदापूर पोलिस स्टेशन हे एक सुसज्ज कार्यालय दिसत आहे एकूणच इंदापूर पोलीस हे इंदापूरकरांचे मन जिंकण्यात यशस्वी झालेले आहेत .