इंदापूर : ‘दूध’ हे प्राचीन काळापासून पौष्टिकतेची खाण मानलं गेलंय.दूध प्यायल्याने एकच लाभ होत नाही तर असंख्य लाभ होतात. प्राचीन काळापासून चांगल्या स्वास्थासाठी दुधाचे सेवन केले जात आहे. इंदापूरमध्ये चहासाठी जशी ‘पकाचा चहा’ला पसंती आहे तशीच इंदापूर कॉलेजच्या समोर नव्याने चालू केलेल्या ‘देवकर मसाला दूध सेंटरला’ युवकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.इंदापूर कॉलेजच्या गेट समोर माळवाडीचे अशोक देवकर यांनी गरम गरम मसाला दूध सेंटर इंदापूरकरांसाठी उपलब्ध केलेले आहे हा व्यवसाय सायंकाळी 5 ते 11 पर्यंतच चालू असतो या दुधात वेगवेगळे मसाले टाकल्याने हे दूध पिण्यास रंगत येते त्यामुळे संध्याकाळच्या वेळी तरुणांची दूध पिण्यास गर्दी असते. हे दूध शरीरासाठी उपयुक्त असल्याने इंदापूरकरांची पसंती या दुधास मिळत आहे.
दिवसभर कष्ट करून दूध डेअरीला दूध दिल्यानंतर हातात मजुरी ही शिल्लक रहात नाही हे लक्षात आल्यानंतर श्री देवकर यांनी डेअरीला दूध देण्यापेक्षा अशा प्रकारचा व्यवसाय केल्यास नफा मिळतो याची खात्री झाल्यानंतर इंदापूर कॉलेजच्या गेट समोरील पटांगणात पत्र्याची भट्टी तयार करून ग्राहकांसाठी मसाला दूध विक्रीस ठेवण्यास सुुुुुरुवात केली आहे त्यामुळे आता डेअरीला दूध देण्यापेक्षा या व्यवसायातून नफा जास्त राहत आहे अशी माहिती अशोक देवकर यांनी दिली.दुधात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात.त्यामध्ये कॅल्शियम हाडं मजबूत बनवतात तर पोटॅशियम, फॉस्फोरस, मॅग्नेशियम, प्रोटीन, विटॅमिन्ससारखे गुण दिवसभर ऍक्टिव्ह राहण्यास मदत करतात. त्यामुळे दूध डेअरीला घालण्यापेक्षा अशा प्रकारे नवीन व्यवसाय चालू करून स्वतःची उपजीविका चालवण्याकडे वळला आहे.