राजाराम पवार ( इंदापुर) वय 75 यांना सहा महिन्यापासून पोटदुखीचा त्रास होत होता, आर्थिक परिस्थितीमुळे ते ऑपरेशनसाठी टाळाटाळ करत होते, त्यांच्या नातेवाईकांनी श्री विश्व-माऊली हॉस्पिटल डॉ. वासुदेव पिसे यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. पोटाची सोनोग्राफी केल्यास कळून आले की, रुग्णाच्या मूत्राशयामध्ये मोठा खडा अडकला आहे आणि दोन्ही किडनींना सूज आली आहे. ऑपरेशन गरजेचं होतं, किडनींना सूज असल्यामुळे ऑपरेशन लवकरात लवकर करणे गरजेचे होते,नातेवाईकांना आजारच गांभीर्य सांगून दुसऱ्याच दिवशी शत्रक्रिया करण्यात आली. एक तास चाललेल्या या शत्रक्रियेमध्ये तब्बल 8 सेमी चा मोठा खडा मूत्राशयातुन काढण्यात डॉ. वासुदेव पिसे यांना यश आले. शत्रक्रियेनंतर 5 व्या दिवसी आजोबांना सुखरूप डिस्चार्ज देण्यात आला, त्यामुळे त्यांचे सर्व कुटुंब डॉ. पिसे हे जनरल सर्जन व दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ञ आहेत यांनी केलेल्या कामाचे कौतुक करत आहेत.पत्ता: श्री विश्व माऊली हॉस्पिटल चैतन्य हॉस्पिटलच्या मागे मार्केट यार्ड समोर,इंदापूर रोड बारामती..