इंदापूरमध्ये पालखी मुक्कामाच्या स्थळावरून इंदापूर ग्रामस्थ विरुद्ध प्रशासन वाद चांगलाच शिगेला पोहोचला असून, वारकऱ्यांसाठी अनेक दृष्टिकोनातून सोयीस्कर असलेला पारंपरिक पालखी तळ बदलण्याचा निर्णय प्रशासन आणि देहू संस्थानाच्या हेकेखोरपणातून घेण्यात आल्याचा आरोप इंदापूरच्या ग्रामस्थांकडून केला जात आहे. या निर्णयाविरोधात इंदापूर ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाणार असल्याचेही बोलले जात आहे. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात पालखी येण्याच्या दिवशी इंदापूर बंदही होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.मात्र अशा परिस्थितीतही कालपर्यंत प्रशासनाने ठरवलेले ठिकाणी म्हणजेच आयटीआय ग्राउंड या ठिकाणी इंदापूरकरांचा विरोध असला तरीही कामाची गती कमी झालेली दिसून आली नाही. या ग्राउंड मधील अंतर्गत रस्ते व कंपाउंड तोडून पालखी मार्गस्थ होण्यासाठी लागणार रस्ता ही सर्व काम जोमात चालू आहे. जेसीबी,ट्रॅक्टर याचा वापर करून काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी धडपड चालू आहे.म्हणून येणाऱ्या काळामध्ये इंदापूरकर विरुद्ध प्रशासन व देहू संस्थान हा संघर्ष आणखी वाढू शकतो.