इंदापूर प्रतिनिधी : शुक्रवार दिनांक 22 जुलै रोजी वनविभागाचे कर्मचारी ज्ञानदेव बाबुराव ससाणे रा.कळस हे इंदापूर अकलूज रोडवर खुळे चौकातून जात असताना वटलेले झाड तोडत असताना त्यांच्या अंगावर पडल्याने यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.आज निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी कळस येथे जावून ससाने कुटुंबांचे सांत्वन केले तसेच इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क करून ससाणे यांच्या मृत्यूस जबाबदार व्यक्ती यांच्या वरती कारवाई करण्याची मागणी केली.
राजवर्धन पाटील म्हणाले की,’ ही घटना दुर्दैवी असून यामुळे ससाणे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. या संकटातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने त्यांना द्यावी अशी यावेळी प्रार्थना केली.
Home Uncategorized इंदापुरात झाड अंगावर पडून मृत्यू झालेल्या वनकर्माचारी कळस येथील ससाणे यांच्या कुटुंबाचे...