इंदापुरातील ऐतिहासिक वस्तूच्या पडझडीचा फायदा घेत अतिक्रमण केलेल्यांवर कारवाई करत सदरची अतिक्रमणे हटवा- इंदापुरातील शिवभक्ताची मागणी.

इंदापूर हे ऐतिहासिक गाव असून या गावांमध्ये मालोजीराजांचे वास्तव्य होते ही सर्व इंदापूरकरांना अभिमानाची गोष्ट आहे. इंदापूरची ओळख सांगणाऱ्या रामवेस परिसरातील अतिक्रमणे काढण्यासंदर्भात नुकतेच इंदापूर नगरपालिकेला व तहसील ऑफिसला भारत जामदार या शिवभक्ताने एक निवेदन दिले आहे व सदर फोटोही निवेदन देताना दाखवले आहेत या निवेदनात असे म्हटले आहे की, इंदापूर हे ऐतिहासिक शहर आहे आणि या शहरांत ऐतिहासिक वास्तु खुप मोठ्या प्रमाणात आढळून येतात. आणि त्या वास्तुंची झालेली पडझडीचा फायदा घेवून स्थानिक लोकांनी रामवेस परिसरात अतिक्रमण करून त्या जागेवर घरे,टपऱ्या इत्यादी प्रकारे अतिक्रमण करून त्या जागा बळविण्याचा प्रयत्न चालु आहे आणि त्यांना पाठबळ म्हणून नगरपालिका त्या जागेवरील वास्तुची काही पैश्यासाठी खोटया नोंदी लावून त्या माणसांना एक प्रकारे पाठबळ देण्याचे काम करीत आहे.त्यामुळे आपणांस विनंती करतो की, सिटी सर्व्हे मध्ये उपलब्ध असलेल्या नोंदी व नकाशे घेऊन आपण शहरांतील जिथे जिथे महाराष्ट्र शासनांची जागा असेल तेथील अतिक्रमण काढावे अन्यथा नगरपालिका व तहसिल कार्यालय यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे थाळी नाद आंदोलन करीत आमरण उपोषणांस बसु यांची आपण दखल घ्यावी असं असल्याचे निवेदन आज नगरपालिका इंदापूर यांना देण्यात आले. आता हा विषय इंदापूर नगरपालिका व तहसीलदार कशा पद्धतीने हाताळते हे पाहण्याजोगे ठरेल.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here