इंदापुर: इंदापूर नगरपरिषदेच्यावतीने नविन नगरपरिषद प्रशासकीय इमारती शेजारी,शंभर फुटी रोड,इंदापूर येथे आज सोमवार दि.१४/२/२०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजता महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री मा.श्री.हर्षवर्धनजी पाटील यांचे शुभहस्ते तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा.श्री.आप्पासाहेब जगदाळे,सोनाई उद्योग समुहाचे अध्यक्ष मा.श्री.दशरथदादा माने यांचे उपस्थितीत व नगराध्यक्षा सौ.अंकिता शहा यांचे अध्यक्षतेखाली “योगभवन” या इमारतीचा भूमीपुजन समारंभ कार्यक्रम तसेच सायंकाळी ६:०० वाजता पंचायत समिती, इंदापूर येथे नगराध्यक्षा सौ.अंकिताताई शहा यांचे शुभहस्ते व मा.श्री.हर्षवर्धनजी पाटील व मा.श्री.आप्पासाहेब जगदाळे यांचे उपस्थितीत डॉ. एम.के इनामदार यांना “मानपत्र ” प्रदान सोहळा तसेच शहरातील सर्व डॉक्टरांना कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी शहरातील नागरिकांनी, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी हेच निमंत्रण समजून कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन गटनेते कैलास कदम यांनी केले.