वैभव पाटील :प्रतिनिधी
मुंबई, ता. ४ : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील बोटोशी गावातील सीता दिवे या गरोदर महिलेला आरोग्य यंत्रणेने केलेल्या मदतीचे वृत्त समजताच आज विधान परिषद उपसभापती ना डॉ नीलम गोऱ्हे यांनी या सर्व अधिकाऱ्यांचे विशेष पत्र देऊन अभिनंदन केले आहे.
‘आपल्या सारख्या सतर्क अधिकाऱ्यांनी अशा प्रसंगांमध्ये दाखविलेले प्रसंगावधान आणि कार्य तत्परता यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळत आहे. आपले आणि आपल्या चमूचे हार्दिक अभिनंदन आणि आभार’, असे डॉ. गोऱ्हे यांनी पत्रात नमूद केले आहे.याबाबत उपसभापती कार्यालयाकडून शिवसेना पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्या विनया पाटील आणि स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.
Home ताज्या-घडामोडी आरोग्य अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या गरोदर महिलेच्या प्रसूतीसाठी प्रसंगावधान आणि कार्य तत्परतेबाबत डॉ....