प्रतिनिधी: हनुमंत निमगिरे
जेऊरवाडी चे ग्रामदैवत श्री महादेव यात्रेनिमित्त आज जेऊर करमाळा बायपास येते भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे .या कुस्ती आखाडा साठी करमाळा माढा मतदार संघाचे आमदार संजय मामा शिंदे उपस्थित राहणार आहेत. या कुस्ती आखाडा मध्ये पहिली कुस्ती पैलवान महारुद्र काळेल व पैलवान सुनील फडतरे यांच्यामध्ये लागणार आहे .तर दुसरी कुस्ती अनिल जाधव (कुर्डूवाडी) व राघू ठोंबरे (कोल्हापूर) यांच्यामध्ये असणार आहे. आणि तिसरी कुस्ती भैरव माने( जेऊरवाडी) व लिंगराज होनमाने (कोल्हापूर) यांच्यामध्ये आहे. चौथी कुस्ती सतपाल सोनटक्के( कंदर) व सुनील खताळ (कोल्हापूर) यांच्यामध्ये लागणार आहे .या प्रमुख नेमलेले कुस्त्या आहेत. आणि इतर लहान गट ते मोठा गट यांच्यामध्ये दीडशे ते दोनशे कुस्ती नेमलेल्या आहेत. या कुस्ती आखाड्याचे आयोजन महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे व ग्रामस्थ यांनी केले आहे .अतिशय सुंदर आणि भव्य असा हा कुस्ती आकडा जुन्या परंपरेप्रमाणे लाल माती वरच होणार असून होणार असून या कुस्ती आखाडा साठी कुस्तीप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन जेऊरवाडी ग्रामस्थ यांच्याकडून जनता एक्सप्रेस मराठी न्यूज मार्फत सर्वांना केले गेले आहे.