आमदार नितेश राणे यांचा दौंड पोलिसांना आरोपी बादशहा शेख व इतरांना पकडण्याकरिता ४८ तासांचा अल्टिमेट…

👉 दौंडमध्ये हिंदू जन आक्रोश ठिय्या आंदोलन.
👉 ४८ तासानंतर दुसरा एपिसोड तयार होईल- आ. निलेश राणे.
प्रतिनिधी : महेश सूर्यवंशी
दौंड मध्ये हिंदू-भगिनींच्या झालेल्या छेडछाडीच्या निषेधार्थ दौंड पोलीस स्टेशन समोर हिंदू जन आक्रोश ठिय्या आंदोलना मध्ये आज दि. १७ रोजी दुपारी झाले. या आंदोलनामध्ये आमदार नितेश राणे हे हजर होते. दौंड पोलीस स्टेशन वर धडक मोर्चा मध्ये राणे सामील झाले . यामध्ये गुन्हेगारांकडून होत असलेले गैरवर्तनांना आळा घालण्याचे पोलीस प्रशासनाला नितेश राणे यांनी आव्हान केले आहे. जर कोणी यापुढे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असतील व हिंदू भगिनींकडे आणि भावांकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याचे डोळे नीट ठेवणार नाही असा सज्जड दम आमदार राणे यांनी भरला आहे.
दौंड मधील घोलप आणि जमदाडे कुटुंबियांना मारहाण केल्या प्रकरणी आरोपी बादशहा शेख यासह बाकी सहआरोपींना ४८ तासाच्या आत अटक करण्याचा अल्टिमेट आमदार नितेश राणे यांनी पोलिसांना दिला आहे. आरोपींना अटक झाली नाही तर ४८ तासानंतर दुसरा एपिसोड सुरू होईल असे त्यांनी सांगितले. यापुढे दौंड मधील प्रत्येक घटनेवरती नितेश राणे लक्ष ठेवून असेल व आगामी काळात अधिवेशनात विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित केला जाईल तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पुढील कारवाईचे पोलिसांना आदेश दिले जातील . व यापुढेही हिंदू भगिनींच्या पुढे नितेश राणे हजर असेल असेही आमदार राणे यांनी पत्रकार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले . यावेळी हिंदू जन आक्रोश ठिय्या आंदोलनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here