आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून माळवाडी गावाचा कायापालट करणार- नूतन सरपंच मंगल व्यवहारे.

इंदापूर: काल इंदापूर तालुक्यातील 26 ग्रामपंचायत चा निकाल झाला. तालुक्यातील अतिशय चुरशीच्या झालेल्या या ग्रामपंचायतींमध्ये सर्वांचे लक्ष हे माळवाडी ग्रुप ग्रामपंचायतीवर होते.
भाजपाचे नेते सतीश व्यवहारे यांची पत्नी व राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब व्यवहारे यांची पत्नी यांच्यात लढत असल्याने हा सामना चुरशीचा होणार यात शंका नव्हती. या दोन्ही प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते.अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने यामध्ये बाजी मारली आणि मंगल बाळासाहेब व्यवहारे या 91 मतांनी थेट सरपंचपदी निवडून आल्या.पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब व्यवहारे त्याचप्रमाणे माळवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय रायकर,राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष दीपक रायकर, माजी सरपंच नागनाथ व्यवहारे, महादेव व्यवहारे,माधव मोरे, साधू वलेकर, मदन बापू व्यवहारे, अक्षय व्यवहारे, निखिल व्यवहारे, गोकुळ व्यवहारे, सुभाष वलेकर, बापू ज्ञानदेव गार्डे या सर्वांनी लावलेल्या ताकतीमुळे राष्ट्रवादीच्या सर्वच म्हणजे अकरा जागा निवडून आल्याचा दावा केला जात आहे.मुळात या 11 पैकी 7 जागा बिनविरोध झाल्या होत्या व 4 जागांसाठी ही निवडणूक लागली होती.वनिता भास्कर मदने,लक्ष्मी  गडदे,यमुनाबाई पांडुरंग गोफने, सतीश भीमराव ठवरे, पोपट शिंगाडे, अश्विनी हरिभाऊ म्हेत्रे, कासाबाई सखाराम गार्डे ही सात उमेदवार बिनविरोध झालेले आहेत.तर ज्ञानदेव गार्डे, बापू व्यवहारे,गणेश भोंग, सारिका बाळासाहेब मोरे हे चार राष्ट्रवादीचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून आलेले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आमदार दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली निधी आणत गावचा समतोल विकास करण्यास कटिबद्ध आहे असे नूतन सरपंच मंगल बाळासाहेब व्यवहारे यांनी निवडून आल्यानंतर प्रतिक्रिया दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here