आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मागणीला यश, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी निरा डावा कालवा सोडण्याचे तातडीने दिले आदेश. शेतकऱ्यांना मिळणार दिलासा.

इंदापूर: महाराष्ट्रात ठीक ठिकाणी पाऊस हा कमी जास्त प्रमाणात पडला आहे.इंदापूर तालुक्यामध्ये मात्र समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकरी आता पिके कशी जगवायची? याचाच विचार करत आहे. यामुळे शेतकऱ्यांची पिकांबाबतची चिंता वाढली आहे.हीच अडचण ओळखून इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे निरा डावा कालवा तातडीने सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी जलसिंचन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच आ.भरणे यांच्याशी चर्चा करून व माहिती घेऊन निरा डावा कालवा तातडीने सोडण्याचे आदेश दिले.सद्यस्थितीत भाटघर 42%,नीरादेवधर 47% तर वीर धरण 36 % या प्रमाणात भरले आहे.

इंदापूर तालुक्यात अत्यल्प पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची गरज भासत आहे त्यामुळे पिकांना पहिले पाणी देऊन त्यानंतर पावसाचा अंदाज घेत शेटफळ हवेली तलावामध्ये पाणी सोडण्याचे आदेशही अजितदादा पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला अशी माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना दिली दिली.
नीरा डावा कालवा हा शेतकऱ्यांसाठी वरदान असून या कालव्याद्वारे 22 गावातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत असतो त्याचप्रमाणे शेटफळ हवेली तलावसुद्धा या कालव्यावर अवलंबून असल्याने अजितदादा पवार यांनी दिलेल्या आदेशामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.
याबाबत ज्येष्ठ जलतज्ञ बाळासाहेब करगळ म्हणाले की,”उद्या दिनांक 22 जुलै रोजी या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार असल्याने आ.दत्तात्रय भरणे यांच्या मागणीला एकप्रकारे यश मिळाले आहे व पावसावर अवलंबून असलेल्या पिकांना याद्वारे दिलासा मिळणार आहे असे मत बाळासाहेब करगळ यांनी व्यक्त केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here