इंदापूर तालुका प्रतिनिधी: संतोष तावरे
इंदापूर प्रतिनिधी: पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आप्पासाहेब जगदाळे यांची संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने सत्कार करून अभिनंदन केले.पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२१-२६ च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी इंदापूर ‘ अ ‘ मतदार संघ तालुका प्रतिनिधी या मतदारसंघातून विद्यमान संचालक आप्पासाहेब नानासाहेब जगदाळे यांची संचालकपदी बुधवारी ( दि.२२) बिनविरोध निवड झाली. त्यांच्या या निवडीबद्दल
इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने
आप्पासाहेब जगदाळे यांचे अभिनंदन केले.
आप्पासाहेब जगदाळे हे इंदापूर तालुका सोसायटी अ मतदारसंघातून बँकेवर प्रतिनिधित्व करीत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अप्पासाहेब जगदाळे यांचाच एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची पुन्हा संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. या बिनविरोध निवडीबद्दल अप्पासाहेब जगदाळे यांचा सत्कार करताना इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षण समितीचे ज्ञानदेव बागल (अध्यक्ष-इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक समिती) ,वसंत फलफले(सभापती-इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था) सुनील वाघ (पुणे जिल्हा नेते शिक्षक समिती) जयप्रकाश कांबळे(उपसभापती-इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था) संचालक नितीन वाघमोडे , विलास शिंदे,सुनील शिंदे,विजय पाटील प्रदीप कुमार कुदळे,सुभाष भिटे,गणेश सोलनकर,नजीर शिकीलकर,संदीपान लावंड,शिवाजी जाधव,किरण म्हेत्रे,सुरेश माने,राहुल निर्मळ,विनय मखरे इत्यादी उपस्थित होते.