पुणे (इंदापूर):-इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असून श्री जयभवानीमाता पॅनलच्या प्रचारासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल घोलप घराण्यातील युवा नेतृत्व व छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उभे असलेले पृथ्वीराज घोलप यांच्यासाठी मैदानात उतरत कुरवली या ठिकाणी जाहीर सभा घेतली होती. ही सभा कुरवली येथील जय हनुमान मंदिर या ठिकाणी होणार होती, परंतु पावसामुळे अचानक या सभेचे ठिकाण बदलावे लागले तरीही सभासद शेतकऱ्यांनी पृथ्वीराज घोलप यांच्या प्रेमा खातीर या सभेसाठी तुडुंब गर्दी केली होती. यावरूनच पृथ्वीराज घोलप यांची लोकप्रियता किती आहे हे दिसून येत होते. या सभेसाठी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे, तसेच साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक तसेच इतर मान्यवर व सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलताना म्हणाले की जर कारखाना खरंच आर्थिक संकटातून बाहेर काढायचा असेल तर आपण पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली जो श्री जयभवानीमाता पॅनल उभा केला आहे.त्या पॅनल मधील सर्वांनाच आपण मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.या कारखान्याला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून महाराष्ट्र मध्ये नावलौकिक केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असेही यावेळी अजितदादा पवार यांनी सभासद शेतकऱ्यांना सांगितले. त्याचबरोबर अजितदादा पवार यांनी आपल्या भाषणामध्ये बोलताना पृथ्वीराज घोलप यांनी छत्रपती शिक्षण संस्थेविषयी केलेल्या वक्तव्याची दखल घेत त्यांनी लागलीच सभेच्या ठिकाणाहूनच काही उद्योगपतींची संपर्क साधून या संस्थेला आर्थिक मदत करण्यासंदर्भात चर्चा केली व लवकरच यावरती आपण मार्ग काढू असे पृथ्वीराज घोलप यांना सांगितले.यावेळी पृथ्वीराज घोलप यांनीही आपले मुद्देसूद भाषण करताना या कारखान्या संदर्भात राज्य शासन व केंद्र शासनाची मदत घेऊन किंवा एनसीडीसीच्या माध्यमातून आर्थिक मदत आणण्यासाठी अजितदादांची गरज आहे आणि हे काम फक्त अजितदादाच करू शकतात त्यामुळे हा कारखाना जर चालवायचा असेल तर अजितदादा आणि भरणे मामांचे सहकार्य आणि मार्गदर्शनाची गरज आहे.
आगामी काळात सर्व संचालक मंडळ आणि सर्व कामगार यांची एकजुटीने टीम करून आम्ही सर्व प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आमचा संपूर्ण वेळ देऊन कारखान्याची परिस्थिती सुव्यवस्थित आणण्यासाठी योगदान देणार आहोत. सर्व ऊस उत्पादक सभासदांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करून कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देऊ, खर्चावर नियंत्रण करून सर्व गोष्टींची काटकसर करून कारखान्याला जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी वेगवेगळे उपाययोजना करून सर्व गोष्टी तंतोतंत केल्यास आपला छत्रपती कारखाना येणाऱ्या काळात राज्यात पहिल्या पाच मध्ये आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही असेही आवराजून यावेळी पृथ्वीराज घोलप यांनी सांगितल्यावर सभासद शेतकऱ्यांनी हात उंचावून टाळ्या वाजवून पृथ्वीराज घोलप यांच्या आव्हानाला दाद दिली.
Home Uncategorized आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत पृथ्वीराज घोलप यांनी केली अजितदादांना मागणी..मागणीची अजितदादांकडून त्वरित...