आदर्श माता श्रीमती. तुळसाबाई (नानी) मारुती भोंग यांचे दुःखद निधन.

निमगाव केतकी व संपूर्ण पंचक्रोशीत एक आदर्श माता म्हणून नावलौकिक मिळविलेल्या श्रीमती तुळसाबाई मारुती भोंग(वय वर्षे ९१ ) यांचे रविवार दि.६ मार्च २०२२ रोजी सकाळी ७ वाजता रहात्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ भोंग परिवारावर ती नाही तर संपूर्ण निमगाव गावावरती दुःखाचा डोंगर कोसळा आहे.संपुर्ण गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.निमगाव केतकी मधील सर्व छोट्या मोठ्या दुकानदार , व्यापारी यांनी दुपारपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवून दुःख व्यक्त केले.
तुळसाबाई भोंग या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच लाडक्या होत्या.सगळे त्यांना नानी या नावाने बोलत .नानी यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली,सुन,नातु,नात सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. नानींच्या अंत्यविधीसाठी पुणे जिल्ह्यातुन नातेवाईक, विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ खुप मोठ्या संख्येने उपस्थित होते.तुळसाबाई भोंग यांना सावडण्याचा विधी मंगळवार दि.८ मार्च रोजी सकाळी ७ वाजता होणार आहे.
त्या इंदापूर तालुका युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष,ग्रा.पं.निमगाव केतकी चे माजी सदस्य माणिक (आबा) भोंग, इंदापूर तालुका सुकाणू समितीचे अध्यक्ष बाळासाहेब भोंग, विठ्ठल भोंग, महाराष्ट्र पोलीस ज्ञानदेव शेंडे,व इंदापूर तालुका युवक काँग्रेसचे सरचिटणीस बापूसाहेब बोराटे यांच्या आजी होत्या.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here