श्रीयश नलवडे :जनता एक्सप्रेस मराठी न्यूज
इंदापूर: गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल व डिझेल दराच्या किमती वाढल्यानंतर सर्वसामान्य माणसांना महागाईचा सामना करावा लागत आहे.याबरोबरच पेट्रोल डिझेल दराचा आता फटका जेसीबी मालक यांनाही बसू लागला आहे. कारण डिझेलच्या किमती वाढल्याने जेसीबी मालकांचा होणारा खर्च,ड्रायव्हर पगार,जेसीबीचे कर्ज हप्ते, जेसीबी मेंटेनन्स साठी चा खर्च या सर्व गोष्टींवर वाढत्या डिझेल दराचा परिणाम होत असल्याने दिनांक 1 नोव्हेंबर 2021 पासून इंदापूर जेसीबी युनियन येथील सर्व जेसीबी मालक यांनी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
सद्यस्थितीत जेसीबीने काम करावयाचे असल्यास प्रतितास 1200 रुपये मोजावे लागणार आहेत. अशी माहिती जेसीबी मालक अमोल खराडे यांनी आज दिली.
एकूणच सर्वसामान्य व्यक्तींबरोबरच आता जेसीबी मालकांनाही महागाईचा सामना करावा लागत आहे या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत होत असल्याने पेट्रोल व डिझेल याचा दर कधी कमी होतोय याकडे सर्वसामान्य व्यक्ती “चातक” पक्षाप्रमाणे वाट पाहत आहे.