आता एकच लक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर जनशक्ती संघटनेचा झेंडा- अतुल खूपसे पाटील, 30 जुलै रोजी महत्त्वपूर्ण बैठक.

करमाळा दि २८:- करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद च्या 6 गटासाठी व पंचायत समितीच्या 12 गणासाठी आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांसोबत हितगुज करण्यासंदर्भात करण्यासाठी 30 जुलै रोजी सकाळी 10 वाजता करमाळा शहरातील दत्त मंदिर येथेबैठक आयोजित केली आहे.या बैठकीस तालुक्यातील जनशक्ती संघटनेच्या पदाधिकारी ,कार्यकर्ते, व इच्छुक उमेदवार यांनी वेळेवर उपस्थित राहावे अशी विनंती जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांनी केली आहे.याबाबत अधिक माहिती देताना अतुल खुपसे पाटील म्हणाले की जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून आपण ही निवडणूक लढवावी अशी भूमिका माझ्याकडे शेकडो कार्यकर्ते व्यक्त। करत आहेत.कार्यकर्त्यांची भावना विचारात घेऊन,विचार विनिमय करण्यासाठी 30 जुलै रॊजी हि बैठक आयोजित केली आहे,या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे तसेच या बैठकीस गट व गण नुसार इच्छुकांच्या मुलाखती व भावना जाणून घेतल्या जातील.संघटनेची ताकत व एकजूट समाजिक कामासाठी व जनतेंचे प्रश्न सोडवण्यासाठी गरजेची आहे त्या करिता या बैठकीला वेळेवर उपस्थित राहावे अशी विनंती त्यांनी शेवटी केली.या वेळी त्यांच्या सोबत अतुल राऊत,दत्ता कोकणे,शरद एकाड ,दीपाली डिरे,हनुमंत कानतोडे,वैभव मस्के कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here