आज होणार इंदापूर न्यायालयीन इमारतीचे अभासी पद्धतीने उद्घाटन होणार : पी.एल.पाटील,दिवाणी न्यायाधीश क.स्तर

इंदापुर: इंदापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्धाटन आज दिनांक ०६ फेब्रुवारी २०२२ रोजी मा.न्यायमूर्ती श्री नितीन जामदार उच्च न्यायालय मुंबई यांच्या शुभहस्ते अभासी पद्धतीने होणार आहे.सदर कार्यक्रम हा मा.न्यायमूर्ती श्री सुरेंद्र तावडे उच्च न्यायालय मुंबई यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.तसेच ना.अजित पवार्‌ उपमुख्यमंत्री म.राज्य हे सदर कार्यक्रमास अभासी पद्धतीने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मा.ना. अदिती तटकरे राज्यमंत्री विधी व न्याय विभाग मा. ना. श्री दत्तात्रय भरणे राज्यमंत्री सा.बा. विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत व श्री.संजय देशमुख प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे यांच्या अध्यक्षतेखाली अभासी पद्धतीने कोविड १९ च्या नियमांचे पालन करून उदघाटन कार्यक्रम संपत्न होणार आहे.तरी उदघाटनाच्या कार्यक्रमास अभासी पद्धतीने उपस्थित राहावे असे आवाहन श्री पी. एल.पाटील दिवाणी न्यायाधीश क.स्तर इंदापूर व ऍड पी.व्ही खरात अध्यक्ष वकिल संघ इंदापूर यांनी केले आहे. सदरचाा कार्यक्रम युट्युब वरून लाईव्ह असणार आहे त्यासाठी पुढील लिंक वरून पाहता येईल https://youtu.ba/aEI-xfj9r14
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here