इंदापूर || 15 मे रोजी इंदापूर तालुक्याच्या दक्षिण भागातील बोराटवाडी आणि खोरोची भागात 33 कोटी 59 लाख रुपयाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन उद्घाटन समारंभ राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व राष्ट्रवादी पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
नुकतीच इंदापूर तालुक्यासाठी अतिशय महत्वाची असणारी आणि गेले 25 ते 30 वर्षापासून प्रलंबित असणारी लाकडी निंबोडी उपाशी जलसिंचन योजना राज्यमंत्री भरणे यांच्या प्रयत्नातून मार्गी लागली आहे. या योजनेच्या 348.11 कोटी किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा विषय होता. योजना पूर्ण करील तेव्हाच दारात मत मागायला येईल असा शब्द भरणे यांनी तालुक्याला दिला होता. तो शब्द त्यांनी पूर्ण करत विरोधकांकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या “निष्क्रिय लोकप्रतिनिधी” या टीकेला जोरदार चपराक देत गेल्या काही महिन्यांपासून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून इंदापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यात विकास घडवण्याचा कार्यक्रम राज्यमंत्री यांच्याकडून होत आहे.त्यामुळे उद्याच्या खोरोची येथील जाहिर सभेत भरणे हाच मुद्दा पकडत विरोधकांवर तुटून पडण्याची शक्यता असल्याने त्यांच्या जाहिर सभेकडे आत्तापासूनचं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.बोराटवाडी येथील नीरा नदीवरील पुल बांधणे 16 कोटी, खोरोची येथील नीरा नदीवरील पुल बांधणे 12 कोटी, खोरोची राष्ट्रीय पेयजल योजना लोकार्पन 1 कोटी 57 लक्ष तसेच बोराटवाडी व खोरोची येथील विविध विकास कामे अशा एकूण 33 कोटी 59 लक्ष रुपयाच्या कामाचे विविध विकास कामांचा भूमिपूजन उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6.00 वाजता खोरोची येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची जाहिर सभा होणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आजी माजी पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे