कुर्डूवाडी (प्रतिनिधी : नसीर बागवान) कुर्डूवाडी येथे दलित स्वयं सेवक संघाची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये दलित स्वयंसेवक संघ यापूर्वी कुठल्याही निवडणुकीत भाग घेत नव्हता .परंतु प्रत्येक निवडणुकीत मातंग समाजातील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा देऊन प्रचारातही सहभागी झालेला आहे. मातंग समाजातील उमेदवारांना उमेदवारी मिळविण्यासाठी संघाची ताकद देखील लावली होती. दलित स्वयंसेवक संघ मधूनही आमदार काही मंत्री झाले.काही लोकांनी स्वार्थापायी संघापासून फारकत घेतली. त्यामुळे संघाची प्रगती रोखण्याचे काम करण्यात आली त्यामुळे संघाला पुन्हा गतवैभव प्राप्त करण्यासाठी राजकारणात सहभागी झाले पाहिजे याकरता महाराष्ट्रातील आजी-माजी व युवकांनी सहभागी झाले पाहिजे असे आवाहान उपस्थित नेत्यांनी केलेे. या मिटिंग मध्ये माननीय विजय पोटफोड यांची महाराष्ट्र राज्य संघ प्रमुख पदी निवड करण्यात आली. या बैठकीमध्ये सोपानराव चव्हाण.वैजनाथ वाघमारे,देविदास राजूधडे,संजय केंदळे प्रभाकर वैराळ,मिलिंद ,दिनेश माने,राजेंद्र कसबे ,श्रीधर कांबळे,बाळासाहेब साबळे,सिताराम साबळे,उत्तर सोलापूर विजय पोटफोडे,बापू मोरे,बालाजी घोडके,अमोल पोटफोडे,उत्तर शहर समाधान वायदंडे,पंढरपूर परशुराम मोहिते माढा माणिक रणदिवे माळशिरस पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीचे निमंत्रक संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ता अडसूळ हे होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक रणवीर लोंढे.माढा तालुका अध्यक्ष .डी एस एस संतोष कांबळे.शहराध्यक्ष दत्ता कांबळे .राज भिसे .रणजीत आडसूळ . आयुष जाधव.प्रेम लोंढे .यांनी परिश्रम घेतले.