अहिल्यादेवी होळकर जयंतीकडे निमगाव केतकी ग्रामपंचायत प्रशासनाने फिरवली पाठ. ग्रामसेवक, सरपंच ,उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यही अनुपस्थित.

महाराष्ट्रात शासकीय, निमशासकीय कार्यालयात राष्ट्रपुरुष, थोर व्यक्तींची जयंती साजरी करणे बंधनकारक असताना निमगाव केतकी येथील ग्रामपंचायत प्रशासनाला याचा विसर पडल्याचे दिसून येते.(दि.३१.मे) राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी होत असताना निमगाव केतकी ग्रामपंचायत प्रशासनाने महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाला केराची टोपली दाखवल्याचे निदर्शनास आले.निमगाव केतकी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये प्रत्येक महापुरुषांची जयंती साजरी होत असते परंतु आज राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती साठी सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित असताना ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्य अनुपस्थित होते.या गोष्टीचा बहुजन मुक्ती पार्टी चे तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोंग यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून शासनाच्या परिपत्रकाचा अवमान करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही करावी अशी मागणी निमगाव केतकी मधून होत आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here