इंदापूर तालुक्यातील निरा डावा या कालव्याचे अस्तरीकरणाचे काम चालू आहे त्यास विरोध करण्यासाठी आज दि.७|१०|२०२२ रोजी अंथूर्णे येथील इरिगेशन बंगला या ठिकाणी शेतकरी संघटना व सर्व शेतकरी बांधव यांच्या उपस्थितीत सकाळी ठीक 11 वाजता महाएल्गार ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती जनता एक्सप्रेस मराठी न्यूजला शेतकरी संघटनेचे इंदापूर तालुका युवक आघाडी तालुका अध्यक्ष सचिन कोथमिरे यांनी दिली .पुढे ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने आम जनतेची मागणी नसताना देखील नीरा डावा कॅनलला अस्तरीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला, हा निधी फक्त ठेकेदारांना जगण्यासाठीच महाविकास आघाडीने हे पाऊल उचलले आहे .त्यामुळे जनतेचा पैसा जनतेच्या विरोधात वापरण्याचा हा फंदा महाविकास आघाडी सरकारने घेतला होता.पाण्यासाठी सर्व जनता वणवण करत असताना व इंग्रजांच्या वाईट काळातही निरा डावा कॅनल खोदला गेला व आजूबाजूच्या शेतकऱ्याची पाण्यासाठीची वणवण थांबली. सन १८८८ मध्ये निर्माण झालेला हा निरा डावा कालवा करण्याचा मूळ उद्देश असा होता की, भूगर्भातील पाण्याचा जलस्तर उंचावणे हा होता, पण महाविकास आघाडी सरकारने इंग्रजापेक्षा जुलमी पद्धतीने वागून निरा डावा कालव्याचे अस्तरीकरणाचा निर्णय घेऊन शेतकऱ्याचा विश्वासघात केला आहे असा घनाघात पश्चिम महाराष्ट्राचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग रायते यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना केला. हा सदरचा अस्तरीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करून कार्बन क्रेडेट प्रमाणे वाटर क्रीडेट प्रकल्प राबवावा व शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे याच मागणीसाठी उद्या अंथूर्णे येथे ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनासाठी पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माननीय पांडुरंग रायते उपस्थित राहणार असून त्यांच्याबरोबर शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हजर असणार आहेत. तरी सर्व शेतकरी बांधवांनी या आंदोलनासाठी उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी संघटनेने केले आहे.
Home Uncategorized अस्तरीकरणाचे काम तात्काळ बंद करण्यासाठी आज अंथूर्णे येथे शेतकरी संघटना व शेतकरी...