इंदापुर तालुका प्रतिनिधी: संतोष तावरे
इंदापुर: काल अवसरी-बेडशिंगे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी चंद्रकांत कवितके यांची बिनविरोध निवड झाली. या अगोदर उपसरपंचपदी सोमनाथ जगताप हे होते. पण त्यांनी राजीनामा दिल्यामुळे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी एक मताने चंद्रकांत कवितके यांची बिनविरोध निवड केली.गावाच्या सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूने सर्व सदस्यांनी चंद्रकांत कवितके यांची उपसरपंच पदी नाव सुचवले.त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड केली गेली. निवड झाल्यानंतर चंद्रकांत कवितके यांनी सगळ्यांचे आभार मानले .या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक रूपाली व्यवहारे यांनी काम पाहिले. यावेळी अवसरी बेडशिंगे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच श्री संदेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्या सौ.नंदा झगडे,सौ. ऋतुजा मोरे ,सौ .संगीता शिंदे,सौ. सुनंदा कदम,सौ. मनीषा उंबरे,ग्रामपंचायत सदस्य श्री पांडुरंग कांबळे, नितीन यादव,श्री सोमनाथ जगताप,शिपाई नितीन कांबळे,गणेश तिकोटे,कर्मयोगी सहकारी साखर कारखाना माजी संचालक श्री विष्णू मोरे,समाधान मोरे,संजय झगडे,बाबा झगडे.,आदित्य शिंदे .असे बहुसंख्य लोक उपस्थित होते. यावेळी बिनविरोध पदी निवड झालेले चंद्रकांत कवितके यांनी मत व्यक्त केले की, “सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी माझ्यावर विश्वास देऊन माझी निवड केली, मी या विश्वासाला कधीही तडा न जाता पूर्ण क्षमतेने ताकतीने गावासाठी काम करेल आणि लोकांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करेल”. यावेळी अवसरी बेडशिंगे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. संदेश शिंदे यांनी त्यांचा हार नारळ फेटा देऊन त्यांचा सत्कार केला.