बारामती: राज्यात अवकाळी पावसामुळे पशुधनाची फार मोठे नुकसान झाले आहे राज्यामध्ये 1डिसेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे लहान मोठी जनावरे मृत्युमुखी पडले आहेत ,बारामती तालुक्यातील सुपा कुतवळवाडी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली या ठिकाणी राज्यभरात याचा फटका बसला असून पुणे जिल्ह्यामध्ये सुमारे 2000 जनावरांची मृत्यू झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली तसेच सातारा जिल्ह्यामध्ये 200जनावरे नाशिक जिल्ह्यामध्ये 515 जनावरे अहमदनगर जिल्ह्यामध्ये 713 जनावरे आणि रायगड येथे 2 जनावरे मृत्यूमुखी पडल्याची माहिती देण्यात आले तसेच पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यात 750 आंबेगाव तालुक्यात 403 शिरूर तालुक्यात 381 पुरंदर तालुक्यात 150 मावळ तालुक्यात 110 खेड तालुक्यात 94 बारामती तालुक्यात 88 दौंड तालुक्यात 44 व हवेली तालुक्यात 23 एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनावरांचा मृत्यू चा आकडा असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे यामध्ये पंचनामे सुरू असून कुणाचे राहिले असल्यास त्यांनी पशुसंवर्धन अधिकारी यांचे कडे जाऊन पंचनामे करून घेण्याच्या सूचना दिल्या राज्यमंत्री भरणे पुढे म्हणाले तसेच कानाडवाडी येथील लांडग्यांच्या हल्ल्यात 24 शेळ्या मृत्युमुखी पडल्याची घटनेचा आढावा घेऊन वनविभातील अधिकारी वर्गाला तात्काळ मूल्यांकन करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.अवकाळी पावसामुळे मृत्यूमुखी पडलेल्या शेळी मेंढी करिता 4000 रु, गाई करिता 40000रु,बैल 30000 रु इतकी नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री मुकणे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे,आदी उपस्थित होते.