अमोलराजे इंगळे यांनी कर्मयोगी कारखाना निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज केला दाखल.
इंदापूर प्रतिनिधी: आज दिवसभर कर्मयोगी कारखान्याच्या संचालक पदासाठी फॉर्म भरण्याचे काम चालू होते. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घेत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे वजन वाढवले आहे. इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया दि. २२ सप्टेंबर पासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात येत असून आज दि. २४ सप्टेंबर२०२१ रोजी पर्यंत कर्मयोगी कारखान्याच्या २१ जागा वरती नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असताना अमोल गुलाब इंगळे शुक्रवार (दि.२४ सप्टेंबर २०२१) रोजी त्यांनी ऊस उत्पादक इंदापूर गट क्र.१ येथून अर्ज दाखल केला.
माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे अत्यंत कट्टर व विश्वासू मानले जाणारे अमोलराजे इंगळे हे तरुण युवक नेतृत्व असून प्रथमच त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे .एक तरूण चेहरा म्हणून जनतेपुढे त्यांच्या माध्यमातून उमेदवार उभा राहिला आहे.त्यांनी आज पर्यंत थोरामोठ्यांचा मान राखत विविध सामाजिक कार्यातून जनतेच्या हृदयामध्ये एक ठसा उमटवलेला आहे. आज त्यांनी कर्मयोगी सहकारी साखर कारखाना येथे जाऊन कर्मयोगी शंकरराव पाटील (भाऊ) यांच्यापुढे नतमस्तक होऊन आशीर्वाद घेत त्यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केला. इंदापूर तालुक्यात अमोल राजे इंगळे यांनी युवकांचे मोठं संघटन करून या संघठन मार्फत वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले आहेत कोरोना सारख्या महामारीत अनेक लोकांना त्यांनी मदत केलेली आहे त्याचप्रमाणे कोरोना काळात पुणे मुंबई वरून चालत येणाऱ्या लोकांसाठी भोजन व्यवस्था करून त्यांनी अनेकांची मने जिंकली होती.
इंदापूरचे तहसीलदार व सहाय्यक निर्णय निवडणूक अधिकारी श्रीकांत पाटील, सहाय्यक निबंधक जिजाबा गावडे, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी अर्ज स्वीकारला.यावेळी बिभिषण गुरगुडे, किरण सरडे, नारायण आसबे, शहाजी चोपडे, बबन इंगळे, मोहन इंगळे, अजित गायकवाड इत्यादी उपस्थित होते.