इंदापूर: गेल्या काही दिवसापासून इंदापूर पोलिस स्टेशनची कामगिरी दमदार स्वरूपाची झालेली दिसून येत आहे.अनेक चोरीप्रकरणी उघडकीस करून मुद्देमाल हस्तगत करणे, बेकायदेशीर गोमांस,दरोडा अशा गोष्टी नियंत्रित आणून एक प्रकारे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात इंदापूर पोलिस स्टेशन यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.अनेक गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तडीपार करून सामान्य लोकांना एक प्रकारे दिलासा देण्याचा प्रयत्न इंदापूर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सिंघम अधिकारी मुजावर साहेब यांच्या माध्यमातून होत आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा वाहतूक नियंत्रण व कायदा संस्था राखण्यात पो. नि.मुजावर यांची टीम यशस्वी झालेले दिसून आली होती.त्यातच इंदापूर येथील देशपांडे व्हेज समोर पुणे – सोलापूर हायवेच्या सर्विस रोड लगत एका अपघात कार मध्ये इंदापूर पोलिसांना तब्बल १८ लाख रुपयेचा गांज्या सापडला असल्याची माहिती इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली.सविस्तर माहिती अशी की, इंदापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत संत तूकाराम महाराज पालखी मुक्काम इंदापुर शहरात असल्याने सर्तक पणे पेट्रोलिंग व नाईट राउंड तसेच बंदोबस्ताने पॉईन्ट चेक करीत असताना इंदापुर पोलीसांना सरडेवाडी येथील टोल प्लाजावर कामकरणारे महाराष्ट्र सुरक्षा बल नॅशनल हायवे पूणे सोलापूर यांच्या सुरक्षा रक्षकांनकडुन माहिती मिळाली की पायल सर्कल जवळ हॉटेल देशपांडे व्हेज समोर सर्व्हिस रोड लगत एक टोयटा कंपनीची चारचाकी कारचा अपघात झाला असुन सदरच्या कारने कोणत्या तरी अज्ञात वाहनास पाठीमागुन धडक दिली असुन सदर कारचा चालक व मालक हे कार सोडुन पळुन गेले आहेत अशी माहिती मिळाल्याने रात्र पाळी कर्तव्यावर असणारे इंदापुर पोलीसांनी त्या ठिकाणी जावुन घटनास्थळाला भेट दिली.सदर ठिकाणी एक पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी दिसुन आली तिचा नंबर RJ 06 CE-9228 असा असल्याने सदरची कार हि पर-राज्यातील असल्याने गाडीचे चालक व मालक यांची घटनास्थळी आजुबाजुला माहीती घेतली असता त्याची माहीती मिळुन न आल्याने कार बाबत संशय निर्माण झाल्याने अपघात ग्रस्त संशईत कारची पाहणी केली असता गाडीच्या पाठीमागील डिकी मधुन उग्रवास येत असल्याने कारची डिकी उघडुन पाहीले असता त्यामध्ये गांज्या भरून ठेवलेल्या पिशव्या दिसुन आला.सदरचा गांज्या हा दोन पंचा समक्ष पंचनामा करून त्याचे मोजमाप केले असता सदरचा गांज्या २८ किलो ५०० ग्रॅम त्याची किमंत अंदाजे ६,००,००० /- रूपये (सहा लाख ) व एक टोयटा कंपनीची चार चाकी कार नं.RJ-06-CE 9228 तिची किंमत १२,००,०००/- रूपये (बारा लाख) किंमतीची कार असा एकुन १८,००,०००/- रूपये (आठरा लाख ) किंमतीचा मुदेमाल इंदापुर पोलीसांकडुन जप्त करण्यात आला आहे.
सदर कारचा अज्ञात चालक व मालक यांचे विरुध्द् एन.डी.पी.एस ॲक्ट भा.द.वि कलम तसेच मो. वा. का. कलम असे विविध कलमान्वये इंदापुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. कमांक ५०१/२०२२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही सदरची कार्यवाही हि पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तयुब मुजावर, सहा. पो. निरीक्षक नागनाथ पाटील, सहा.पो.निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, सहा. पो. निरीक्षक महेश माने, पो. उप निरीक्षक दाजी देठे, सहा. फौजदार ताबे, सहा. फौजदार चालक कदम, पो. ना. चौधर,पो.ना.भोईटे, पो.ना. गायकवाड, पो. ना मोहिते, पो.ना.खान, पो.ना. मड्डी, पो. कॉ. शिंगाडे, पो. कॉ. विशाल चौधर, पो. कॉ. राखुडे यांचे पथकाने केली आहे.