काटी (भरतवाडी) येथील गेल्या अनेक दिवसांपासून नादुरूस्त असलेले विद्युत रोहित्र माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या एका फोनवर तात्काळ बदलण्यात आले असुन त्या ठिकाणी नुकतेच 100 के.व्हि.ए.चे नविन विद्युत रोहित्र बसविण्यात आल्याने परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.काही दिवसांपुर्वी या ठिकाणीचे विद्युत रोहित्र अति दाबामुळे जळाले होते.तेव्हापासून येथील विजपुरवठा खंडित झाला होता.या विषयी परिसरातील शेतकऱ्यांकडून सातत्याने नविन विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी करण्यात येत होती.परंतु प्रशासनाकडून कोणतिही दखल घेण्यात आली नव्हती.त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा श्रीमती छाया पडसळकर यांनी हि बाब तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या कानावर घातली आणि शेतक-यांच्या मगणीची दखल घेत दत्तामामांनी अधिकाऱ्यांना भरतवाडी येथे नविन विद्युत रोहित्र बसविण्याचे निर्देश दिले होते.त्यामुळे नुकतेच येथे नविन विद्युत रोहित्र बसविण्यात आले असुन शेतकऱ्यांचा विजपुरवठा पूर्ववत झाला आहे.शेतकरी वर्गाच्या मागणीची दखल घेऊन दत्तामामांच्या माध्यमातून तात्काळ प्रश्न मार्गी लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.