अनुकंपा लाभाबरोबरच वारसा हक्काने नियुक्ती देणेसाठी नगरविकास विभागाकडे मागणी केली आहे – नगरपालिकेकडून खुलासा

इंदापूर नगरपरिषद आंदोलनकर्त्यांच्या भुमिकेशी सकारात्मक असून शासनस्तरावर नगरपरिषद दिवंगत सफाई कर्मचारी यांचे वारसास नियुक्ती देणेसाठी अनुकंपा लाभाबरोबरच वारसा हक्काने नियुक्ती देणेसाठी नगरविकास विभागाकडे मागणी केली असलेची माहिती नगराध्यक्ष अंकिता मुकूंद शहा व मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी दिली.
इंदापूर नगरपरिषद मैदानात दि.१५ नोव्हेंबर २०२१ पासून दिवगंत सफाई कर्मचारी यांच्या वारसांनी गेल्या १० ते १५ वर्षांपासून नियुक्ती न मिळाल्याने प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की इंदापूर नगरपरिषदेच्या सात दिवगंत कर्मचारी यामध्ये चार सफाई कर्मचारी, एक शिपाई, एक मजूर,एक लिपिक यांचे वारसास अनुकंपातत्वानुसार नियुक्ती देणेसाठी मा.जिल्हाधिकारी, नगरपरिषद प्रशासन विभागाकडे प्रस्ताव २०१९ मध्ये दाखल केले आहेत.पुणे जिल्ह्याची दिवंगत नगरपरिषद कर्मचारी यांचे वारसास अनुकंपातत्वानुसार नियुक्ती देणेबाबत प्रारूप कर्मचाऱ्यांची नांवे ३१ मे २०२१ ला प्रसिद्ध करण्यात आली.यामध्ये सदर चार सफाई कर्मचारी यांचे वारस महेश दशरथ सरवदे,माधुरी बाळू पवार, शिवाजी तानाजी मखरे,सारिका चंद्रकांत सोनवणे यांची नांवे वगळण्यात आली.सदर सफाई कर्मचारी यांचे वारसास वारसा हक्कानुसार नगरपरिषद स्तरावर देणेस पात्र असलेचे कळवले आहे. तथापि मयत कर्मचारी यांचे नियक्ती कोर्टाचे आदेशाने झालेली असून स्थायी आदेशानुसार कोर्टामार्फत नियुक्त कर्मचारी यांचे वारसास वारसा हक्क लागू होणार नाही नमूद असल्यामुळे आजतागायत मयत कर्मचारी यांचे वारसदार यांना लाड बर्वे कमिटीच्या शिफारशीनुसार नियुक्ती देण्यात आलेली नाही.
काही नगरपरिषद दिवंगत कर्मचारी १आँगस्ट २००५ पुर्वीचे आहेत.सदर वारसदार यांना स्थायी आदेश पुर्वलक्षी प्रभावाने लागू आहे किंवा नाही तसेच रोजंदारी कर्मचाऱ्यांबाबत न्यायालयाचे आदेशाने नगरपरिषदेत सेवेत कायम करण्याचे आदेश दिले असतील व त्याप्रमाणे शासन त्या कर्मचाऱ्यांना अनुकंपा लाभ राहील असे नमुद आहे तर वारसा हक्कासाठी का करता येत नाही.यासाठी मा.संचालक,नगरपरिषद प्रशासन संचालनालय,मुंबई यांचेकडे तसेच जिल्हाधिकारी यांचेकडे पाठपुरावा करणार असलेची माहिती नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम यांनी दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here