अनावश्यक खर्च टाळून प्रतिक देवकाते यांनी मूकबधिर निवासी शाळेमध्ये केले शालेय साहित्य वाटप व खाऊ वाटप

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून प्रतिक देवकाते या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांने इंदापूर येथील मूकबधिर निवासी शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप व खाऊ वाटप करत आपला वाढदिवसाचा आनंदोत्सव साजरा केला.प्रतिक देवकाते हा वरकुटे खुर्द येथील रहिवासी असून आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असतो गोरगरीब जनतेच्या अडीअडचणीला धावून जाणारा हा प्रतीक भरणेमामांच्या मार्गदर्शनाखाली ऍडमिशनची कामे करत असतो त्याचबरोबर पंचक्रोशी मध्ये गोरगरीब लोकांच्या आरोग्याशी संबंधित मदत मिळवून देण्याकरिता ही त्याची धडपड चालू असते.
आपण यापुढील प्रत्येक वाढदिवस हा समाज उपयोगी कार्यक्रम साजरा करून करणार आहोत असे प्रतिक याने यावेळी सांगितले.
प्रतिकच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर येथील मूकबधिर निवासी शाळेत शालेय साहित्य व खाऊ वाटप करतेवेळी रासपाचे जिल्हाध्यक्ष किरण गोफने, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तानाजी शिंगाडे, प्रदीप रुपनवर, ,सचिन खामगळ, सागर पवार, किरण जाधव, सुहास कारंडे, आकाश पांढरे इत्यादी युवक उपस्थित होते.
यावेळी मूकबधिर निवासी शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी प्रतिकने केलेल्या मदतीविषयी आभार मानले.वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून प्रतिक देवकाते या युवा कार्यकर्त्यांनी इंदापूर येथील मूकबधिर निवासी शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप व खाऊ वाटप करत आपला वाढदिवसाचा आनंदोत्सव साजरा केला.
प्रतीक देवकाते हा वरकुटे खुर्द येथील रहिवासी असून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असतो गोरगरीब जनतेच्या अडीअडचणीला धावून जाणारा हा प्रतिक विद्यार्थ्यांची ऍडमिशनची कामे करत असतो त्याचबरोबर पंचक्रोशी मध्ये गोरगरीब लोकांच्या आरोग्याशी संबंधित मदत मिळवून देण्याकरिता ही त्याची धडपड चालू असते.
आपण यापुढील प्रत्येक वाढदिवस हा समाज उपयोगी कार्यक्रम साजरा करून करणार आहोत असे प्रतिक याने यावेळी सांगितले.प्रतिकच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर येथील मूकबधिर निवासी शाळेत शालेय साहित्य व खाऊ वाटप करतेवेळी रासपाचे जिल्हाध्यक्ष किरण गोफणे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तानाजी शिंगाडे, प्रदीप रुपनवर, ,सचिन खामगळ, सागर पवार,करण जाधव, सुहास कारंडे, रोहन जाधव,अक्षय पांढरे, ऋषी जाधव इत्यादी युवक उपस्थित होते.यावेळी मूकबधिर निवासी शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी प्रतिकने केलेल्या मदतीविषयी आभार मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here