रोकठोक अजितदादा: “कसल्याही परिस्थितीत आज दुपारपर्यंत मला अहवाल पाठवण्याची व्यवस्था करा”- कांदलगाव प्रकरणात स्टेजवरूनच थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सीईओला कॉल.

गेल्या काही दिवसापासून इंदापूर तालुक्यातील कांदलगावातील प्रकरण भरपूर चर्चेत आले आहे. कांदलगावातील युवकांनी रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप करत पंचायत समिती इंदापूरमध्ये उपोषणाचे अस्त्र निवडले होते. गावातील वेगवेगळ्या पक्षाचे युवक एकत्र येऊन आपल्या गावात झालेल्या भ्रष्टाचाराविषयी वाचा फोडताना दिसून आले होते. गावातील तब्बल 13 रस्त्यांमध्ये अनियमितता झालेली असून एकूण 39 लाख रुपयांच्या निधीमध्ये गडबड आहे असा आरोप गावकऱ्यांकडून केला जात होता.हे प्रकरण इतके गाजले होते की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या प्रकरणाची चौकशी करा असे सीईओना तोंडी आदेश केले होते. सीईओंनी त्वरित त्रिसदस्य चौकशी समिती स्थापन करून गावामध्ये प्रत्यक्षात रस्ता मोजणी व घडलेला प्रकार पाहण्यासाठी कांदलगावला ही समिती लावण्यात आलेला होती. त्याप्रमाणे गेल्या आठवड्यामध्ये प्रशासकीय अधिकारी श्री येळेसाहेबांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक रस्त्याचे निरीक्षण होऊन मोजणीही झाली होते त्यानंतर गावकऱ्यांची एक बैठक घेऊन सोमवार 12 सप्टेंबर रोजी वस्तुनिष्ठ अहवाल आपणास मिळेल असे समितीकडून सांगण्यात आले होते. परंतु 12 तारखेला अहवाल मिळाला नव्हता. व अहवाल न मिळाल्याने उलट सुलट चर्चाही चालू झाल्या होत्या. आज पुण्यातील सकाळी 7.30 वाजता मार्केट कमिटीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आल्यानंतर कांदलगावातील युवक त्यांना स्टेजवर भेटायला गेले होते. स्टेजवर फक्त दोनच लोकांना येण्यास परवानगी मिळाली आणि अजितदादांनी सर्व झालेल्या प्रकाराची जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले व कांदलगावातील काशिनाथ ननवरे या युवकाकडून माहिती घेतली. माहिती घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्वरित सीईओ साहेबांना मोबाईलद्वारे संपर्क केला. “तुम्ही 12 तारखेला अहवाल का दिला नाही? हा गंभीर विषय आहे कोणालाही पाठीशी घालू नका मी स्वतः यात लक्ष घातलं आहे आज दुपारपर्यंत कसल्याही परिस्थितीत मला अहवाल पोचण्याची व्यवस्था करा” असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीईओ साहेबांना दिला.सीईओसाहेबांनी सुद्धा आज दुपारपर्यंत कसलेही परिस्थितीत आपणापर्यंत अहवाल पोहोचवण्याची व्यवस्था करतो अशी ग्वाही दिली.आता आज दुपारपर्यंत किंवा उद्याच्या दिवसापर्यंत हा अहवाल गावकऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे.एकंदरीतच आपला रोखठोक बाणा जपत चांगल्या कामासाठी दादागिरी करणारे उपमुख्यमंत्री कांदलगावातील युवकांसह स्टेजवरील नेतेमंडळींनी अनुभवला.आता अहवाल काय येणार? नक्की यात भ्रष्टाचार झालाय का? झाला असेल तर तो कशा पद्धतीने? आणि यामध्ये कोण कोण अधिकारी सामील आहेत? ते उघडे पडणार का? व त्यांच्यावर कारवाई होणार का? हे येणाऱ्या काळामध्ये समजेल.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here